Belagavi

वीरसंगप्पा डिब्बी यांचे नेत्र व त्वचा दान

Share

बेळगावच्या बाजार गल्ली, वडगाव येथील वीरसंगप्पा शंकर डिब्बी (वय 87) यांचे नुकतेच निधन झाले.
मृतांच्या शेवटच्या इच्छेनुसार बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांचे नेत्र व त्वचा दान करण्यात आली आहे.
त्यांचे दोन डोळे केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या नेत्रपेढीला दान करण्यात आले तर त्यांची त्वचा केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या केएलई-रोटरी स्किन बँकेला दान करण्यात आली, जेणेकरून भाजलेल्या रूग्णांना लवकर बरे होण्यास मदत होईल.
वीरसंगप्पा यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.
दरम्यान, अवयवदानाबाबत अधिक माहितीसाठी डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टशी ९२४२४९६४९७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल असे कळविण्यात येईल आहे.

Tags: