Belagavi

तीन दिवसीय हेरिटेज किचन थिएटर फेस्टिव्हलचे आयोजन

Share

बेळगाव रंगसंपदाच्या वतीने शहरातील लोकमान्य नाट्यगृहात ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असे तीन दिवस हेरिटेज किचन थिएटर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अरविंद कुलकर्णी यांनी दिली .

सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, दरवर्षी नवीन कलाकारांना संधी दिली जात आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता राजकीय विडंबनात्मक नाटक मारण मृदंग सादर होणार आहे. मॅडम मेरी क्युरी यांच्या जीवनावर आधारित वैज्ञानिक नाटक १ ऑगस्ट रोजी सादर होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर आधारित नाटय़संध्याचे गीत ,2 ऑक्टोबर रोजी सादर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रामचंद्र गड्डी, प्रशांत राठोड, गिरीश कट्टी, दिलीप मलगी, अशोक कुलकर्णी आदी उपस्थित होते .

Tags: