कावेरी पाणीप्रश्नावरून कर्नाटक रक्षण वेदिके पुन्हा आक्रमक झाली आहे. सिलिकॉन सिटीमध्ये, मल्लेश्वराच्या संपिगे रोडवरील कुवेंपू पुतळ्यासमोर करवे कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कावेरी नदी जल प्राधिकरणाविरोधात निदर्शने केली. त्यांनी पुतळ्याचे दहन करून आपला आक्रोश व्यक्त केला. कृष्णराजसागर आणि इतर जलाशयांमधून कावेरी नदीचे पाणी तमिळनाडूला सोडल्याचा निषेध करत करवे कार्यकर्त्यांनी कावेरी नदी जल प्राधिकरणाविरोधात आंदोलन केले. फ्लो
यावेळी करवे नेते सारा गोविंद यांनी, सर्वोच्च न्यायालयाने वस्तुस्थिती पुन्हा एकदा तपासून पाहण्याची तसेच राज्य सरकारला कार्यक्षमतेने युक्तिवाद सादर करण्याची मागणी केली. कावेरी प्रश्नावर सरकार गोंधळात पडले असून हे कन्नडिगांवर अन्याय आहे, असे ते म्हणाले. बाईट.


Recent Comments