Banglore

कुमारस्वामी यांच्या निर्णयामुळे एनडीएला राज्यात ताकद : येडियुरप्पा

Share

मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए देशभरातील सर्वात मजबूत आणि सर्वात विश्वासार्ह राजकीय आघाडी म्हणून वाढत आहे. एनडीए परिवारात जेडीएसच्या समावेशाचे मी मनापासून स्वागत करतो, असे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले.

बेंगळुरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की, कुमारस्वामींच्या एनडीएमध्ये सामील होण्याच्या निर्णयामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

तमिळनाडूला पाणी देण्याच्या मुद्द्यावर, आम्ही पाणी सोडण्याच्या परिस्थितीत नाही, याबाबत जलाशयांची पाणीपातळी तपासण्यासाठी एखादे पथक पाठवा अशी विनंती अपिलात सर्वोच्च न्यायालयाला केली पाहिजे. न्यायालयाला हे पटवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे, राज्य सरकारने हे केले पाहिजे असे ते म्हणाले.

Tags: