Belagavi

पौरकार्मिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू : आ. राजू सेठ

Share

शहराची स्वच्छता राखून सर्वांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या पौरकार्मिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही बेळगाव उत्तरचे आ. आसिफ उर्फ राजू सेठ यांनी दिली.

बेळगाव महानगरपालिकेतर्फे आज, शनिवारी पौरकार्मिक दिनानिमित्त पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर पौरकार्मिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आ. राजू सेठ, उपमहापौर रेश्मा पाटील यांनी हवेत फुगे सोडून स्पर्धांचे उदघाटन केले.

त्यानंतर बोलताना आ. सेठ म्हणाले की, पौरकार्मिकांमुळे बेळगाव शहर स्वच्छ व सुंदर राहते, त्याशिवाय स्वचतेमुळे बेळगावकरांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पौरकार्मिकांची काळजी महानगरपालिका, सरकार घेत आहे. आम्ही लोकप्रतिनिधी देखील तुमच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहोत. तुमच्या काही अडचणी असल्यास मनपा आयुक्त,महापौर किंवा माझ्याशी थेट संपर्क साधा. आपले बंधू फिरोज सेठ आमदार असताना पौरकार्मिकांसाठी क्वार्टर्स बांधून देण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला होता. ही घरे आता पूर्णत्वास येत असून लवकरच पौरकार्मिकांना त्यांचे वाटप करण्यात येईल असे आ. राजू सेठ यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी, पौरकार्मिकांच्या कल्याणासाठी बेळगाव मनपाकडून त्यांना आरोग्यविमा, सुरक्षा उपकरणे तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत देण्यात येत आहे. त्याचा पौरकार्मिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.


आ. राजू सेठ, उपमहापौर रेश्मा पाटील, आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याहस्ते हवेत फुगे उडवून पौरकार्मिकांच्या क्रीडास्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. पाहुण्यांनी खेळाडूंची ओळख करून घेतली. फ्लो
यावेळी पौरकार्मिकांसाठी क्रिकेट, धावणे, लिंबू चमचा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. बेळगाव महानगर पालिकेच्या उत्तर आणि दक्षिण विभागातील पौरकार्मिकांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धांमध्ये भाग घेतला.

Tags: