गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलीस आणि राखीव दलाच्या वतीने कुडची शहरातील प्रमुख रस्त्यांवर पथसंचलन करण्यात आले .

सीपीआय रविचंद्रन बडफकीरप्पगोळ , पीएसआय मलाप्पा पुजेरी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनानिमित्त , रायबाग तालुक्यातील कुडची शहरात हे रूटमार्च करण्यात आले .
गुरुवारी शहर पोलिस ठाण्यापासून कर्नाटक सर्कल, रेल्वे स्टेशन, दाऊ हॉटेल , सिंडिकेट बँक, दत्त मंदिर, मलिंगराय मंदिर या प्रमुख रस्त्यांवरून पोलिस ठाण्यापर्यंत हे रूट मार्च करण्यात आले .
या मिरवणुकीत कर्नाटक नागरी पोलीस आणि राखीव दलाच्या जवानांसह 80 हून अधिक जवान यात सहभागी झाले होते.
यावेळी सीपीआय रविचंद्रन बडफकीरप्पगोळ , कुडची पीएसआय मलप्पा पुजेरी, तपास पीएसआय एस जी खोत , हारुगेरीचे पीएसआय गिरिमल्लाप्पा उप्पार, चांदबीबी गंगावती, एएसआय के.एस.साळुंके, अण्णाप्पा मंगसुळी यांचा सहभाग होता.


Recent Comments