पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हुबळी धारवाड महानगरपालिकेचे महापौर, आयुक्त आणि सदस्यांनी धारवाड शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता केली .
धारवाड महानगर पालिकेच्या वतीने धारवाड शहरातील प्रमुख रस्त्यांवर , तसेच परिसरात फिरून स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती करण्याचे काम केल्याचे विशेष दिसून आले.
यावेळी हुबळी धारवाड महानगरपालिकेच्या महापौर वीणा बरदवाड, महानगरपालिकेच्या आयुक्त ईश्वर उल्लागड्डी, महानगरपालिकेच्या सदस्या इरेशा अंचटगेरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments