Belagavi

पंतनगरमध्ये सैनिक भवन बांधणार : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची घोषणा

Share

डिसेंबरपासून बेळगाव ग्रामीण भागात पुनर्विकासाचा टप्पा सुरू होणार असून विकासकामांना मी प्रथम प्राधान्य देणार आहे. पंतनगरमध्ये ५० लाख रुपये खर्चून सैनिक भवन बांधण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.

पंतनगर रहिवासी, माजी सैनिक कल्याण संघ, डॉ. एस. राधाकृष्ण गुरु बळग आणि शिवबसव नगर रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभात बोलताना मंत्री हेब्बाळकर यांनी पंतनगरच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

मंत्री झाल्यानंतर प्रथमच पंतनगरमध्ये आलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मंत्री झाल्यानंतर ही माझी पहिलीच भेट असून तुमच्या प्रेमाने, प्रोत्साहनाने आणि आशीर्वादाने मी दुसऱ्यांदा आमदार म्हणून आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे. तुमच्यामुळेच हे शक्य झाले आहे, तुमचे प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद असेच सदैव मिळतील अशी आशा करते असे त्यांनी सांगितले.

यावेळी स्थानिक रहिवासी शंकरगौडा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष गुलाबी कोलकार, उपाध्यक्ष बीबी हनिफा अफसर जमादार, ग्रामपंचायत सदस्य पार्वती तळवार, एस. एस. हिरेमठ, बी. एन. पाटील, सदाशिव हिट्टनगी, वाय. एल. मुराळ, अर्जुन पाटील, मलगौडा पाटील, साईराम जंबगी, एम. बी. माणकोजी व माजी सैनिक, शेकडो महिला उपस्थित होत्या.

Tags: