किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात दोघांनी विळ्याने वार करून एका रौडीशिटरचा निर्घृण खून केला. ही थरारक घटना रविवारी रात्री कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिगडोळी गावात घडली.

कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिगडोळी गावात रौडीशिटर विजय रामचंद्र अरेर, वय 32 वर्षे, याच्यासोबत कल्लाप्पा सदेप्पा क्यातन्नावर, वय वय 48 वर्षे आणि भरत हित्तलकेरी यांच्यात दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. या भांडणाचे पर्यवसान विजयच्या खुनात झाले.
कल्लाप्पा क्यातन्नावर आणि भरत हित्तलकेरी यांनी त्याच्यावर विळ्याचे वार करून त्याचा खून केला. गंभीर जखमी अवस्थेत अति रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. यावेळी कल्लाप्पा देखील जखमी झाला असून, त्याच्यावर धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments