Vijayapura

राज्यात काँग्रेसचे सरकार नाही तर तालिबानचे सरकार

Share

राज्यात हिंदू रात्रीच्या वेळी फिरू शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे काँग्रेसचे सरकार नाही. तर तालिबानी सरकार आहे. असा आरोप विजयपूर शहराचे आ . बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला .

विजयपूर शहरातील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात आयोजित सार्वजनिक गणेशमूर्ती मंडळांच्या सभेत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर हिंदूंवर हल्ले होत आहेत. म्हैसूरमध्ये खून झाला, शिमोगामध्ये दंगल झाली, गणेशोत्सवासाठी परवानगी घ्यावी, असे सरकार म्हणत आहे. काँग्रेसची सत्ता असल्याने पोलीस आमच्या सभेला आले आहेत. या सगळ्याला आमच्या कार्यकर्त्यांनी घाबरू नये. येत्या ६ महिन्यात सरकार बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले

Tags: