Vijayapura

वासरांची वाहतूक करताना वाहनाचा अपघात : 60 हून अधिक वासरांची सुटका

Share

बुलेरो वाहनाला वासरांची वाहतूक करताना अपघात झाला . बेकायदेशीर रित्या गायींची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील अंजुतगीजवळ स्थानिक शेतकऱ्यांनी पकडले.

रात्री उशिरा बुलेरो पिकअप वाहनाचा अपघात झाला. वाहनातील 60 हून अधिक वासरे सुरक्षित होती . या वासरांचे हातपाय बांधून , तोंडाला टेप लावून बळजबरीने वाहनात कोंबण्यात आले होते .

हे वाहन महाराष्ट्रातील साताऱ्याहून विजयपूरकडे येत होते.वाहनात शस्त्रेही सापडली आहेत. नागरिक इथनं दिसताच येताच संशयीत गाडी सोडून पळून गेला. ही घटना इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत घडली.

Tags: