DEATH

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Share

कर्जाला कंटाळून अवरोळी गावातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .

कर्जफेड करण्यास असमर्थ ठरल्याने , खानापूर तालुक्यातील अवरोळी गावातील महेश नागण्णवर (45) या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल घडली.

मयत शेतकऱ्याने कृषी शेतकरी सहकारी संस्था आणि कर्नाटक विकास ग्रामीण बँकेसह विविध बँकांकडून सुमारे सहा ते सात लाखांचे कर्ज घेतले होते आणि पीक आले नसल्याने कर्जाची परतफेड करता आली नाही.

त्याने मंगळवारी दुपारी घरात कोणी नसताना विष प्राशन केले . ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले . त्यानंतर अधिक उपचारासाठी , बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले . मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला . त्याच्या पश्चात दोन मुलगे आहेत

याप्रकरणी नंदगड पोलीस स्थानकात प्रकरण दाखल करण्यात आले आहे

Tags: