Chikkodi

गणेशोत्सव शांततेत आणि पर्यावरणपूरक रित्या करा साजरा

Share

गणेशोत्सव उत्साहात साजरा करा, जास्त मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपकाचा वापर करू नका. अनावश्यक कर्कश ध्वनिक्षेपक वापरणाऱ्या मंडळांच्या नेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सीपीआय एचडी मुल्ला यांनी दिला.

रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती येथील ग्रामपंचायत सभाभवनात गणेशोत्सव शांतता सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. गणेशोत्सव उत्साहात साजरा करा. मात्र पोलीस विभागाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास मंडळांच्या प्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार असून, पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बसविण्याची सूचना करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे म्हणाले की, गणेशोत्सव सार्थपणे साजरा झाला पाहिजे. देवाच्या नावाने मौजमजा करू नका, दारूच्या नशेत दंगा करू नका. जास्त लाऊडस्पीकर वापरू नका त्याऐवजी पारंपारीक ढोलताशा वाद्य वाजवा . ग्रामीण भागातील कलागुणांना प्रोत्साहन मिळेल.मातीच्या गणपतींवर अधिक भर द्यावा. पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी पीएसआय ऐश्वर्या नागराळ, रुपाली गुडदगी, आनंद बी, ग्राम पंचायत उपाध्यक्ष आझाद तासेवाले, ग्रामपंचायत सदस्य, अजित खेमलापुरे, अनिल आंजे, रावसाहेब खांडेकर, संतोष मंगसुळे, शांतीनाथ पाटील, अरुण शिंदे, अण्णासाहेब खांडोळे, राजेंद्र ताशेवाले ,यांच्यासह अनेक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Tags: