Chikkodi

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धांचे आयोजन

Share

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील जुगुळ गावातील , कर्नाटक शिक्षण समिती प्राथमिक शाळा परिसरात , चिक्कोडी शैक्षणिक जिल्हास्तरीय 8 तालुक्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुलांच्या 2023-24 वर्षाच्या कराटे स्पर्धा पार पडल्या.

जिल्हा पंचायत बेळगाव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, उपसंचालक कार्यालय चिक्कोडी, क्षेत्रीय शिक्षण अधिकारी कार्यालय कागवाड, कर्नाटक शिक्षण समिती, कन्नड माध्यमिक प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा जुगूळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बेळगाव जिल्हा राणी चन्नम्मा सेल्फ डिफेन्स आणि कराटे असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा पार पडल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केएसएस समितीचे अध्यक्ष विलास कडोळे होते . उत्तर कन्नड जिल्ह्याचे सेवानिवृत्त जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी सांगळे यांनी विशेष आयडॉल म्हणून सहभाग घेतला, सन्मान स्वीकारला आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले .

कागवाड सामुदायिक आरोग्य केंद्राचे डॉ. विशाल माळवदकर, चिक्कोडी सीबीके एसएसके चे संचालक अण्णासाब पाटील यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात रोपांला पाणी घालून करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. नंतर आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते मैदान पूजन करून कराटे स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. दरम्यान, बेळगाव जिल्हा राणी चन्नम्मा स्वसंरक्षण व कराटे असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील यांनी स्पर्धांचे नियम सांगितले.

या संदर्भात बसवराज नांदळे, उमेश पाटील, लक्ष्मण आरवडी, सी.एम. संतोष, एस.डी. शिंदे, केएसएस हायस्कूलचे मुख्याध्यापक एम.सी. हुगार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एम.एस. सातगौडा, दरुर, विजयापाटील, श्रीकांत देसाई, बालचंद्र आंबी, गुरू मुडसिंगे यांच्यासह अनेक मान्यवर, जुगूळ गावातील नेते, ग्रामस्थ, चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील कराटे स्पर्धक, कागवाड तालुक्यातील शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. .

Tags: