Belagavi

भाजपचे युवा नेते प्रदीप शेट्टी यांचे आकस्मिक निधन

Share

बेळगावातील भाजपचे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप शेट्टी यांचे काल रात्री उशिरा आकस्मिक निधन झाले.

प्रदीप शेट्टी बेळगाव शहरातील तानाजी गल्ली येथील रहिवासी असून भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय होते.

अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला.

प्रदीप शेट्टी यांचे सामाजिक कार्य अविस्मरणीय आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांचे ते निकटवर्तीय होते.

त्यांच्यासोबत प्रदीप शेट्टी नेहमी सावलीसारखे उभे असत. प्रदीप शेट्टी यांच्या निधनाबद्दल बेळगाव शहरातील अनेक मान्यवर, निकटवर्तीय आणि कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला आहे.

आज दुपारी चार वाजता त्यांच्या तानाजी गल्लीतील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असून, शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags:

#innews #inbelgaum #newskannada #livenews #inbelagavi #inkannada #innews #inbelgaum #inbelagavi #flood #rain #innewsbelagavi