राज्यातील भ्रष्ट काँग्रेस सरकार उलथून टाकण्याची गरज आहे. त्यामुळेच कर्नाटकात भाजप-जेडीएस युती आवश्यक असल्याचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, दोन्ही विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा आधीपासूनच आहे. पुढील साधक आणि बाधक चर्चा करणे आवश्यक आहे. दोन्ही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील, असे ते म्हणाले
भाजप-जेडीएस हे दोन्ही पक्ष असहाय्य आहेत, या काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, आता विरोधी पक्ष इंडिया म्हणून एक झाले आहेत. एकमेकाला पाण्यात पाहणारे ममता बॅनर्जी, सीपीआय, सीपीएम, अरविंद केजरीवाल, काँग्रेस हे सगळे एकत्र आले आहेत. मग ते लाचार आहेत का? राजकारणाच्या इतिहासात अनेक बदल झाले आहेत असे ते म्हणाले.
सीएम सिद्धरामय्या यांनी अडवाणी यांची भेट घेतल्याच्या बी. के. हरिप्रसाद यांच्या वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सिद्धरामय्या यांनी आधीच उत्तर दिले आहे. नेते भेटले तर विचारधारा बदलेल, असे ते म्हणाले. त्याचा अर्थ काय असे त्यानी विचारले.
त्याचवेळी, राज्य सरकारने आजपासून कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. बघूया सरकार आपल्या शब्दावर कितपत ठाम राहते, असे ते म्हणाले. मंत्री डी. सुधाकर यांच्या विरोधातील एफआयआरची चौकशी व्हायला हवी, असेही ते म्हणाले.


Recent Comments