Dharwad

उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात धारवाडमध्ये निदर्शने

Share

तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभा आणि धारवाड जिल्हा ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने शहरात निदर्शने करण्यात आली.

सनातन धर्माविरोधात अवमानकारक वक्तव्य करणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात शहरातील संगोळ्ळी रायण्णा सर्कलमध्ये ब्राह्मण समाजातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्ते, नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हिंदू धर्माविरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करावी, या मागणीचे निवेदन नगरच्या तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.

यावेळी ब्राह्मण समाज संघाचे प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत डंबळ, एसी गोपाळ, विजय नाडजोशी, वीणा हेगडे, वसंत भट, आरडी कुलकर्णी, दत्तमूर्ती कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Tags: