Chikkodi

केरूर येथे बस अडवून विद्यार्थ्यांचे आंदोलन

Share

बस थांबत नसल्याने विध्यार्थीवर्गाची अडचण होत असल्याकारणावरून विध्यार्थ्यानी बस रोको आंदोलन केले.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील केरुर गावात ही घटना घडली. या गावात बसमध्ये जागा नसल्याने व बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी केएसआरटीसी बस थांबवून आंदोलन केले.

गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना बसमध्ये उभे राहण्यासाठी जागा नाही. केरूर गावात बसेस थांबत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर वर्गांना उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे संतापलेल्या विध्यार्थ्यानी हे पाऊल उचलले.

Tags: