Belagavi

बेळगावात पहायला मिळाला बर्निंग कारचा थरार!

Share

बेळगावात आज भरदिवसा बर्निंग कारचा थरार अन तोही चक्क पेट्रोल पंपासमोर पहायला मिळाला. सुदैवानेच पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.

बेळगावातील कोल्हापूर सर्कलजवळील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत मोठी दुर्घटना टाळण्यात मंगळवारी यश मिळवले. बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने एका स्विफ्ट कारच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली.

सुदैवाने कारमधील दोन मुले, महिला व चालक यांना कर्मचाऱ्यांनी बाहेर काढत पंपातील अग्निशमन यंत्राच्या साह्याने तातडीने आग विझविल्याने ते सुखरूप बचावले. ही आग पेट्रोल पंपावर पसरण्यापूर्वीच विझवल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. ही घटना एपीएमपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: