पंचमसाली लिंगायत समाजाला २ ए आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज , निप्पाणी येथील राष्ट्रीय महामार्गावर कुडलसंगम पिठाचे श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजींच्या नेतृत्वाखाली इष्टलिंग पूजा करून , आरक्षणाच्या सहाव्या टप्प्यातील लढ्याची सुरुवात करण्यात आली .

पंचमसाली लिंगायत समाज हा आर्थिक , सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे . या समाजाला २ ए आरक्षण लागू करावे यासाठी , कित्येक वर्षे लढा सुरु आहे . मात्र आतापर्यंतच्या सरकारने त्यांच्या या मागणीची पूर्तता केली नाही . आता राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आहे . ह्या सरकारने पंचमसाली समाजाच्या मागणीची पूर्तता करावी यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी आज निप्पाणी येथील राष्ट्रीय महामार्गावर स्वामीजींच्या हस्ते इष्टलिंग पूजा करण्यात आली . यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
यावेळी श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजीं म्हणाले कि , काँग्रेसचे सरकार असो वा भाजप सरकार, आम्ही आरक्षण मिळवण्यासाठी लढा देणार आहोत.लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सरकारला विनंती करतो.आम्ही तिथे असताना सर्व प्रकारची आंदोलने केली,पण आम्हाला आरक्षण मिळाले नाही,म्हणून काँग्रेस सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही इष्टलिंग पूजनाच्या माध्यमातून लढा सुरू केला.आज, इष्टलिंग पूजेत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर सहभागी झाल्या आहेत.त्या आपल्या समाजाला आरक्षण देतील अशी आशा आहे.
यावेळी बोलतांना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या समाजाचा दिवा असलेल्या श्री.जयमृत्युंजय स्वामीजींच्या समोर लिंगायत पंचमसालींच्या पहिल्या लढ्यापासून ते सहाव्या लढ्यापर्यंत समाजाची मुलगी म्हणून मी सदैव या लढ्यासोबत असेन. ते मला राज्याची दुसरी राणी चेन्नम्मा म्हणतात, पण मी लिंगायत पंचमसाली समाजाचा आणि सरकारचा आवाज असेन , म्हणून मी आज रात्री बंगळुरूला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटेन आणि तुमचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचवणार आणि सरकारवर दबाव टाकेन असे अश्वसन दिले .
यावेळी , राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी , माजी मंत्री शशिकांत नाईक, रोहिणी बाबासाहेब पाटील, पंचमसाली समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


Recent Comments