Belagavi

डीसीपी रोहन जगदीश यांनी केली संवेदनशील भागाची पाहणी

Share

बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डीसीपी म्हणून नुकतीच सूत्रे स्वीकारलेल्या आयपीएस अधिकारी रोहन जगदीश यांनी आज शहरातील संवेदनशील भागात अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

डीसीपी रोहन जगदीश यांनी आज अनगोळ, टिळकवाडी परिसराला अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन संवेदनशील भागाची पाहणी केली. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत खडेबाजार उपविभागाचे एसीपी अरुणकुमार कोलूर, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक दयानंद शेगुणसी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी डीसीपी रोहन जगदीश यांनी संवेदनशील परिसराची पाहणी करून बंदोबस्ताबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Tags: