Belagavi

बेळगावात विसर्जन तलावांच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर

Share

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्याने बेळगाव महापालिका प्रशासनातर्फे शहरातील गणेशोत्सव विसर्जन तलावांच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.बेळगाव मनपातर्फे शहरातील इंद्रप्रस्थनगर येथील जक्कीनहोंडा तलावाची स्वच्छता करण्यात आली.

शहरातील सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन कपिलेश्वर तलाव, जक्कीनहोंडा तलाव, अनगोळ तलाव आदी ठिकाणी केले जाते. या सर्व तलावांची सफाई, किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटी आदी कामे प्रगतीपथावर आहेत. गणेशाच्या आगमनापूर्वीच ही सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्धार मनपाने केला आहे.

गणेशोत्सव जवळ आल्याने पावसाच्या पाण्याने भरलेल्या तलावातील दूषित पाणी वीज पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. तलावातील पाणी कमी झाल्यानंतर गाळ काढण्यात आला. या तलावात दीड, पाच, सात व अकरा दिवसांच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात येते.

Tags: