Belagavi

पशुसंगोपन क्षेत्रात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन, या क्षेत्रात महिला मोठी भूमिका बजावतात असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.  बेळगावातील पशुसंगोपन खात्याच्या

कार्यालयात पशुपालक महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन करून प्रथमोपचार किटचे वाटप केल्यानंतर त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागात पशुसंगोपनात महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या माध्यमातून त्या पूर्ण स्वावलंबी जीवन जगू शकतात. यातून महिला सक्षमीकरण साध्य होते असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री हेब्बाळकर यांच्याहस्ते कार्यक्रमात उपस्थित 100 पशुपालक महिलांना प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले.

शेतकर्‍यांच्या दारात आपत्कालीन सेवा पुरविण्यासाठी सरकारने पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागात 2022 पासून पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत फिरत्या पशुवैद्यकीय विभागाची सेवा सुरू केली आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव तालुक्यात पशुसंजीवनी सेवा अधिकृतपणे सुरू केली आणि जनतेने या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या मोबाईल पशुवैद्यकीय युनिटचे संचालन आणि देखभाल मे महिन्यापर्यंत मुंबई येथील एज्यु स्पार्क इंटरनॅशनल प्रा. लि. ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करणार आहे. या युनिटमध्ये एक पशुवैद्य. पॅरा-टेक्निकल कर्मचारी, चालक, परिचारक सेवा देतील. ते सकाळी 9 संध्याकाळी 5 पर्यंत उपलब्ध असतात. राज्यभरात प्रत्येक तालुक्यासाठी एक असे एकूण 200 फिरते उपचार युनिट कार्यरत आहेत. ही सेवा केवळ आपत्कालीन पशुवैद्यकीय उपचारांसाठी उपलब्ध आहे, पशुधन मालक आपत्कालीन उपचार सेवा मिळविण्यासाठी मोबाइल पशुवैद्यकीय युनिट कॉल सेंटर टोल फ्री क्रमांक 1962 वर संपर्क साधू शकतात. नांगर

बेळगाव तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी राजेश दानवाडकर, पशुवैद्यकीय खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव एन कूले, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पाटील, बेळगाव तालुका पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभागाचे सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: