Belagavi

भाजपला काँग्रेसचा धसका, लोकसभेसाठी जेडीएसशी केली हातमिळवणी

Share

विधानसभा निवडणुकीच्या अपयशातून भाजपला कर्नाटकात मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भाजपने काँग्रेसचा चांगलाच धसका घेतला असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएससोबत या पक्षाने अखेर हातमिळवणी केली आहे.

बेंगळूर येथे आज माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी भाजप-जेडीएस युतीची माहिती दिली. काँग्रेस सरकारचा जोरदार मुकाबला करण्यासाठी विरोधकांमधील युती अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत युती करेल असे त्यांनी सांगितले.

शहरातील फ्रीडम पार्क येथे भाजपने सरकारविरोधात आयोजित केलेल्या आंदोलनात बोलताना ते म्हणाले की, भाजप आणि जेडीएस यांच्या युतीमुळे आनंद झाला आहे. अमित शहा यांनी जेडीएसला चार जागा देण्याचे मान्य केले आहे. आम्ही युती करून सशक्त झालो आहोत. यामुळे आम्हाला 25 पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असे ते म्हणाले.
अमित शहा यांनी जेडीएसला 4 जागा देण्याचे मान्य केले आहे, ज्यामुळे लोकसभा निवडणुकीत मदत होईल. दोन्ही पक्षांची युती झाल्यास भाजप पक्षाला अधिक सत्ता मिळेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, भाजप-जेडीएस युती अत्यंत महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. राज्यातील जनविरोधी काँग्रेस सरकारविरोधात जोरदार लढा देण्यासाठी विरोधी पक्षांमधील युती अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही सर्व मिळून सरकारच्या विरोधात लढू, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माध्यमांसमोर दिली.युती अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत युती करेल असे त्यांनी सांगितले.
शहरातील फ्रीडम पार्क येथे भाजपने सरकारविरोधात आयोजित केलेल्या आंदोलनात बोलताना ते म्हणाले की,

भाजप आणि जेडीएस यांच्या युतीमुळे आनंद झाला आहे. अमित शहा यांनी जेडीएसला चार जागा देण्याचे मान्य केले आहे. आम्ही युती करून सशक्त झालो आहोत. यामुळे आम्हाला 25 पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असे ते म्हणाले.
अमित शहा यांनी जेडीएसला 4 जागा देण्याचे मान्य केले आहे, ज्यामुळे लोकसभा निवडणुकीत मदत होईल. दोन्ही पक्षांची युती झाल्यास भाजप पक्षाला अधिक सत्ता मिळेल, असे ते म्हणाले.

दरम्यान, भाजप-जेडीएस युती अत्यंत महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. राज्यातील जनविरोधी काँग्रेस सरकारविरोधात जोरदार लढा देण्यासाठी विरोधी पक्षांमधील युती अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही सर्व मिळून सरकारच्या विरोधात लढू, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माध्यमांसमोर दिली.

Tags: