अभिनेता प्रकाश राज हा अयोग्य व्यक्ती आहे. प्रकाश राज हे आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले याची काय शाश्वती? अशा शेलक्या शब्दांत माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी टीका केली.
अभिनेता प्रकाश राज यांनी आपला जन्म कोणाच्या पोटी झाला, असे आईला विचारले होते का? आईने सांगितल्यावरच बाप कोण हे कळते. मला प्रकाश राज यांच्या आईबद्दल आदर आहे असे ईश्वरप्पा म्हणाले. तसेच गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दम असेल तर मुस्लिमांच्या जन्मावर प्रश्नचिन्ह लावावे. मुस्लीम कुठे जन्माला आलेत, कुठून आलेत, असा सवाल केला पाहिजे. माहिती असेल तर तोंड उघडावे, असे म्हणत त्यांनी परमेश्वराला फटकारले.
ईश्वरप्पा यांनी उदयनिधी स्टॅलिन, परमेश्वर आणि प्रकाश राज यांच्यावर जोरदार टीका केली. उदयनिधी स्टॅलिन हा एक अयोग्य, वेडा माणूस आहे. उदयनिधी आणि सनातन धर्माचा काय संबंध..? स्टॅलिन कोण आहे? सनातन धर्म हा साधू-संतांच्या तपश्चर्येमुळे आहे. धर्माला हात लावणारा कोणीही वाचला नाही.
सनातन धर्माचा नाश त्यांच्या काका-आजोबांमुळे झाला नाही, होणारही नाही. धर्माविरुद्ध राक्षसी प्रवृत्ती दाखविणाऱ्यांचा नाश होईल, असे ते म्हणाले.
आमदार यत्नाळ हिंदुत्वावर 90% जोरात बोलतात. आमदार बसनागौडा पाटील यत्नाळ हे खरे मर्द आहेत. यत्नाळ आमचे नेते आहेत याचा मला आनंद आहे. पण ते फक्त 10% इकडचे तिकडचे बोलतात, मग आम्ही ते दुरुस्त करतो, असे म्हणत ईश्वरप्पा यांनी आमदार यत्नाळ यांनाही चिमटा काढला.


Recent Comments