Agriculture

पावसाअभावी टँकरद्वारे पिकांना पाणीपुरवठा

Share

एका शेतकऱ्याने आपल्या पिकांना भाड्याच्या टँकरने पाणी पुरवठा केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मेखळी गावात घडली.

होय, यंदा पावसाने ऐन हंगामात ओढ दिल्याने ठिकठिकाणचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उगवण होऊन वाढीला पिके आली असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. रायबाग तालुक्यातील मेखळी गावात गोपाळ रामाप्पा बटनुरे नावाच्या शेतकऱ्याने आपल्या शेतात पावसावर अवलंबून कपाशीचे पीक घेतले होते, मात्र यावेळी पुरेसा पाऊस न झाल्याने हे पीक करपू लागले आहे.

त्यामुळे त्यांनी भाड्याने टँकर मागवून कपाशीच्या पिकाला पाणी देण्यास प्रारंभ केला आहे.

Tags: