बेळगाव राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी त्यांच्या गृह कार्यालयात जनता दर्शन कार्यक्रम घेतला.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगावातील हनुमान नगरातील आपल्या गृह कचेरीत जनता दर्शन कार्यक्रम घेतला. यावेळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील व अन्य ठिकाणच्या लोकांनी मोठी गर्दी केली होती.
लोकांच्या समस्या व मागण्या ऐकून घेत अनेक मंत्री हेब्बाळकर यांनी अनेक समस्यांवर जागेवरच तोडगा काढला. उर्वरितांना योग्य तो तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. काहींनी वैयक्तिक समस्या आणि मागण्या आणल्या, तर अनेकांनी सार्वजनिक समस्या, संघटना आणि गावांच्या मागण्या आणल्या.
लोकांच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या. त्यानंतर त्या बेंगळुर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी बेंगळुरला रवाना झाल्या.


Recent Comments