Belagavi

गौरी महिला मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

Share

बेळगावातील सदाशिवनगरात गौरी महिला मंडळाच्या वतीने आज श्रीकृष्ण जन्माष्टमी जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महिलांनी एकमेकीला हळद व कुंकू लावून ओटी भरून आनंदोत्सव साजरा केला.

सदाशिवनगरातील गौरी महिला मंडळाच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. श्रावण मासानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमात मंडळाच्या सदस्या उत्साहाने भाग घेतात. दरवर्षीप्रमाणे आज मंडळातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी पाळणागीते गाऊन बाळकृष्णाचा जन्म सोहळा साजरा केला.

यावेळी इन न्यूज चॅनलशी बोलताना गौरी महिला मंडळाच्या सदस्या शिल्पा वागराळी यांनी सांगितले की, श्रावण महिन्यात शिवाच्या पूजेला महत्त्व आहे, श्रावण महिना म्हणजे सर्व महिलांसाठी आनंदाचा, श्रावणात प्रत्येकजण शिवाची पूजा करतात, श्रावण हा प्राचीन काळापासून आला आहे, श्रावण महिन्यात समुद्रमंथन झाले होते, समुद्रमंथनातील 14 पैकी 13 रत्ने देव आणि असुरांच्या वाट्याला येतात,

उरलेले एक रत्न हे विष आहे आणि शिव ते पितात. त्यामुळे भगवान शंकराला नीलकंठ हे नाव पडले, तेव्हापासून श्रावण महिन्यात शिवाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे विष्णू अर्थात श्रीकृष्णाच्या पूजेलाही श्रावणात खूप महत्व आहे. विशेषतः जन्माष्टमी आम्ही खूप आनंदाने साजरी करतो.

यावेळी महिलांनी एकमेकीला हळदीकुंकू लावून ओटी भरली. तसेच पारंपरिक पाळणागीते गाऊन कृष्णजन्माचा सोहळा साजरा केला. ललिता सहस्त्रनाम पठणही करण्यात आले. याप्रसंगी गौरी महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री कराडकर, उपाध्यक्षा प्रेमा एत्तीनमनी, सचिव सुजाता व मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.

Tags: