Nippani

निपाणीत भरदिवसा घर फोडून 25 तोळे सोने, 3 लाख रुपये लंपास

Share

चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचा दरवाजा तोडून घरातील 25 तोळे सोने व 3 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहरातील चिमगावकर गल्ली येथे घडली.

ही घटना काल सकाळी 11 ते 11-30 च्या सुमारास घडली असून, उशिरा उघडकीस आली आहे. रफिक अहमद मजीद पाटेकर यांच्या घरावर हा दरोडा पडला आहे. घरमालक रफिक घरी येताच ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांना शोधण्यासाठी सापळा रचला. बेळगाव येथील ठसे तज्ञ, गोकाक येथील श्वान पथक.विभागाने येऊन चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

तिजोरी फोडताना चोरट्यांना जखमा झाल्या व रक्ताचे डाग आढळून आले. चोरट्यांनी चोरीसाठी एक्सा ब्लेड, प्लायर्स, छोट्या बॅटरीसह विविध साधनांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

चोरी करून बाहेर पडत असताना चोरट्यांना काही लहान मुलांनी पाहिले आहे. याप्रकरणी निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags: