Hukkeri

भीमगौडा गिरीगौडर यांनी मेंढपाळ समाजाची मागितली माफी

Share

मेंढपाळ समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या हुक्केरी तालुक्यातील एलिमुन्नोल्ली गावचे शेतकरी नेते, भीमगौडा गिरीगौडर याना तात्काळ अटक करण्याची मागणी करून , हुक्केरी तालुका धनगर समाजाच्या नेत्यांनी केलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर जागे झालेल्या भीमगौडा गिरीगौडर यांनी मेंढपाळ समाजाचे नेते डॉ जयप्रकाश करजगी तसेचनेत्यांच्या समोर माफी मागितली .

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपले शब्द मागे घेऊन मेंढपाळ समाजाचे नुकसान होईल अशा प्रकारे बोलल्याबद्दल माफी मागितली असून तहसीलदारांना कबुली पत्र देणार असल्याचे सांगितले.

मेंढपाळ समाजाचे अध्यक्ष जयप्रकाश करजगी आणि शंकर हेगडे यांनी मेंढपाळ समाजाला लाजवेल अशा पद्धतीने वक्तव्य केलेल्या भीमगौडा गिरीगौडर यांनी आमच्या निषेधानंतर समाजाच्या नेत्यांची माफी मागितली आणि आम्ही वडिलधाऱ्यांचा मान राखून त्यांची चूक मान्य केली आणि आंदोलन मागे घेतले आहे . असे सांगितले .
यावेळी हुक्केरी तालुका मेंढपाळ समाजाचे नेते उपस्थित होते.

Tags: