Belagavi

राज्याच्या पोलीस दलात मोठा खांदेपालट; बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांची बदली

Share

राज्याच्या पोलीस दलात सरकारने मोठा खांदेपालट केला आहे. एकूण 37 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यात बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांचाही समावेश आहे.

राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या या सर्वात मोठ्या बदल्या आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सरकारी आदेश रात्री उशिरा निघाले. बंगळुरूमधील बहुतांश आयपीएस अधिकाऱ्यांना गेट पास देण्यात आले आहेत. बदली झालेले अधिकारी आणि त्यांच्या नव्या नियुक्तीचे ठिकाण

पुढीलप्रमाणे :
1. अनुपम अग्रवाल (मंगळूरच्या आयुक्तपदी बदली)
2 डॉ. एस. डी. शरणप्पा (डीआयजीपी, म्हैसूर पोलीस अकादमी)
3. वर्तिका कटियार (एसपी आयएसडी, बेंगळूर)
4. कार्तिक रेड्डी (डीसीपी, दक्षिण वाहतूक विभाग, बेंगळूर)
5. संतोष बाबू (डीसीपी, प्रशासकीय विभाग, बेंगळूर)
6. यतीश चंद्र (एसपी आयएसडी, बेंगळूर)
7. भीमा शंकर गुळेद (एसपी, बेळगाव)
8. निकम प्रकाश अमृत (एसपी, वायरलेस विभाग)
9. राहुल कुमार शाहपूरवाड (डीसीपी, बेंगळूर दक्षिण विभाग)
10. डी. देवराजू (डीसीपी, पूर्व विभाग, बेंगळूर)
11. अब्दुल अहद (डीसीपी, सेंट्रल डिव्हिजन, बेंगळूर)
12. संजीव पाटील (डीसीपी, व्हाईटफिल्ड)
13. एस. गिरीश (डीसीपी, पश्चिम विभाग, बेंगळूर)
14. परशुराम (एसपी, गुप्तवार्ता, बेंगळूर)
15. एच.डी. आनंद कुमार (एसपी, संचालक नागरी हक्क आणि अंमलबजावणी संचालनालय)
16.सुमन डी. पानेकर (एआयजीपी, मुख्यालय)
17. डेक्का किशोर बाबू (एसपी आणि प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, कलबुर्गी)
18. लक्ष्मण निंबरगी (एसपी, क्राईम रेकॉर्ड ब्युरो, बेंगळूर)
19. डॉ. अरुण (एसपी, उडुपी)
20. मोहम्मद सुजीता (एसपी, हसन)
21. जयप्रकाश (एसपी, इंटेलिजन्स, बेंगळूर)
22. शेखर एच. थेक्कनवर (डीसीपी, सीसीबी-1, बेंगळूर)
23. सारा फातिमा (डीसीपी, पूर्व वाहतूक विभाग बेंगळूर)
24. सोनवणे ऋषिकेश भगवान (एसपी, विजयपुर)
25. लोकेश भरमप्पा (एसपी, पोलीस अकादमी, म्हैसूर)
26. श्रीनिवास गौडा (डीसीपी, सीसीबी-2, बेंगळूर)
27. कृष्णकांत (एआयजीपी, प्रशासन बेंगळूर)
28. अमरनाथ रेड्डी (एसपी, बागलकोट)
29. हरिराम शंकर (एसपी, इंटेलिजन्स)
30. अद्दुरु श्रीनिवासुलू (एसपी, कलबुर्गी)
31. अंशु कुमार (एसपी, कोस्टल सिक्युरिटी फोर्स)
32. कनिका सिक्रीवाल (डीसीपी, कायदा व सुव्यवस्था
33. अंशु कुमार (एसपी, कोस्टल सिक्युरिटी फोर्स)
34. कनिका सिक्रीवाल (डीसीपी, कायदा व सुव्यवस्था विभाग, कलबुर्गी)
35. कौशल चौकसी (सहसंचालक, FSL)
36. रवींद्र काशिनाथ गडादी (एसपी, इंटेलिजन्स)
37. डॉ. वंशकृष्ण (डीसीपी, कमांड सेंटर, बेंगळूर)

Tags: