Belagavi

बेळगावात आरोग्य खात्याच्या लसीकरण कार्यशाळेचे उदघाटन

Share

बेळगाव जिल्हा पंचायत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे बेळगावात लसीकरणावर आयोजित कार्यशाळेचे आज उदघाटन करण्यात आले.

आरोग्य खात्याच्या सभागृहात आज मंगळवारी सार्वजनिक लसीकरण या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन आज जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी, लसीकरणामुळे अनेक सांसर्गिक रोगांचा प्रतिबंध करता येतो.

जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत 11 प्रकारच्या लशी देण्यात येत आहेत. खासकरून गरोदर माता आणि नवजात शिशुंना लस देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा सर्वाना लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी समुदाय आरोग्याधिकाऱ्यांना केले.

जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. चेतन कंकणवाडी यांनी लसीकरण मोहिमेचा संपूर्ण तपशील जाहीर केला. यावेळी चौगुलेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकारी डॉ. राजेश्वरी पाटील यांचे ‘लसीकरणाचे महत्व’ यावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाला तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांच्यासह आरोग्याधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Tags: