Banglore

निंगाव्वा सिंगाडी आजी-सिद्दरामय्यांची भेट

Share

शक्ती योजनेच्या अंमलबजावणीच्या दिवशी मोठ्या आनंदाने शासकीय बसच्या पायरीवर नतमस्तक झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील संगोळ्ळी येथील निंगाव्वा सिंगाडी आजी यांची कलर्स कन्नड वाहिनीच्या “अनुबंध” पुरस्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट झाली. त्यांची भेट झाल्याचा आनंद व्यक्त करत या भेटीची छायाचित्रे फेसबुक अकाउंटवर पोस्ट केली आहेत.


निंगाव्वा सिंगाडी आजी यांची कलर्स कन्नड वाहिनीच्या “अनुबंध” पुरस्कार कार्यक्रमात भेट झाली. त्यांना भेटून आनंद झाला. त्यांच्यासोबतचा फोटो फेसबुक अकाऊंटवर शेअर करून मला समाधान वाटले आणि सर्तक भावही दाटून आला. महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे या हेतूने राबविण्यात आलेल्या शक्ती योजनेच्या पहिल्याच दिवशी संगव्वा यांनी दिलेला प्रतिसाद पाहून आमची ही योजना १०० टक्के यशस्वी होईल असा विश्वास वाटला.
आज आज्जीची भेट घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कलर्स कन्नड वाहिनीचे आभार असे मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे.

Tags: