Belagavi

साई फौंडेशन छत्रपती शिवाजी गार्डनमध्ये स्वच्छता अभियान

Share

बेळगावातील मठ गल्ली येथील साई फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मंजुनाथ नागोजी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी गार्डनमध्ये सोमवारी स्वच्छता अभियान राबवले. उद्यानात टाकलेला प्लास्टिक कचरा, गुटख्याची रिकामे पाकिटे गोळा करून त्यांनी अस्वच्छता दूर केली.
बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेले एकमेव मध्यवर्ती ठिकाण आहे. सर्व शिवभक्तांसाठी मुख्य असे पवित्र स्थान आहे. याच शिवाजी गार्डनमध्ये वेगवेगळे शिवसृष्टी, म्युझियम वॉकिंग ट्रॅक आहे. मात्र या ठिकाणी सध्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक कचरा, गुटखा पाकीट आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यादेखील टाकलेल्या असतात. हेनिदर्शनास येताच लागलीच मंजुनाथ नागोजी यांनी स्वच्छता अभियान राबवून साई फौंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सोमवारी या गार्डनमधील कचरा काढून स्वच्छता करण्यास हातभार लावला.
या संदर्भात इन न्यूजला माहिती देताना मंजुनाथ नागोजी यांनी सांगितले की, शिवाजी गार्डन म्हटलं तर सकाळी पहाटेपासूनच अनेक महिला पुरुष वॉकिंग साठी म्हणून येथे दररोज 500 नागरिक येत असतात. पण येथे टाकलेल्या प्लास्टिक आणि अन्य कचऱ्यामुळे, गुटखा खाऊन टाकलेल्या पाकिटांमुळे अस्वच्छता पसरते. येथील नाल्यामुळे साऱ्यांनाच दुर्गंधी सहन करावी लागते. ते पाहून नाराजी व्यक्त केली जाते. या गार्डनमधूनच शास्त्रीनगर ते बेळणारी नाल्याला जाणारा मुख्य नाला आहे या नाल्यामध्ये शास्त्रीनगर भागातील कचरा प्लास्टिक वाहून या गार्डन परिसरातील नाल्यामध्ये साचून राहिले आहे यामुळे घाण पाणी वाहण्यास अडथळा निर्माण झाल्याने गार्डनमध्ये दुर्गंधी फैलावत आहे. साई फाउंडेशन स्वच्छतेचे पाऊल उचलत आहे. आम्ही प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करत चार हजारहून अधिक कापडी पिशव्या वाटल्या आहेत. हे गार्डन स्वच्छ ठेवण्यास आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत त्याला नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन मंजुनाथ नागोजी यांनी यावेळी केले.
एका कार्यकर्त्याने सांगितले की, हिंदवी स्वराज्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिमान असलेले अनेक स्वाभिमानी बेळगावमध्ये आहेत. पण काही लोक मात्र राजकारणासाठीच त्याचा उपयोग करून घेऊन आपली पोळी भाजून घेत असतात स्वच्छता ठेवणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे असे असताना देखील या ठिकाणी येणारा शिवभक्त असो अथवा इतर कोणताही नागरिक असो यांनी गार्डन स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे या ठिकाणी स्वच्छता साठी फक्त एक माळी ठेवण्यात आला आहे पण वास्तविक पाहता या ठिकाणी चार माळ्यांची गरज असताना देखील महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृह असून देखील ते देखभालीअभावी बंद ठेवले जाते. त्यामुळे नागरिकांची विशेषतः महिला आणि मधुमेही रुग्णांची गैरसोय होते. काही लोक नाईलाजाने उघड्यावर लघुशंका करतात. त्यामुळे इतरांना ऑकवर्ड वाटते. त्यामुळे स्वच्छतागृहाची सोया उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली. बाईट. आणखी एका कार्यकर्त्याने सांगितले की, येथील नाल्यात कचरा टाकणे बंद करण्यासाठी नाल्यावर स्लॅब घालण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मुलांना घेऊन येणाऱ्या नागरिकांनी खाऊची रिकामी पाकिटे व कचरा उद्यानात न टाकता स्वच्छता राखून हे उद्यान आपले स्वतःचे आहे असे समजून काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले.
एकंदर, सर्वांच्या अभिमानाचा केंद्रबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने, त्यांचा पुतळा असलेल्या शिवाजी उद्यानाची स्वच्छता राखण्याची जबाबदारी महापालिका आणि नागरिकांचीही आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी गार्डन स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत तसेच या गार्डनमधून जाणारा नालाही स्वच्छ करून तो झाकण्यासाठी सीडी वर्क काम करून घ्यावे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे

Tags: