Belagavi

बालकल्याण पोलीस अधिकाऱ्यांसाठी बेळगावात कार्यशाळा

Share

समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना मुलांच्या रक्षणाचीही मोठी जबाबदारी पोलीस खात्यावर आहे. त्यांच्या समस्या, बालगुन्हेगारीची प्रकरणे हाताळताना बालमनाचा अभ्यास करून संवेदनशील राहून काम करा असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. पी. मुरली मोहन रेड्डी यांनी केले.


बेळगावातील पोलीस भवनात बालकल्याण पोलीस अधिकाऱ्यांसाठी आज बेळगाव जिल्हा बाल संरक्षण विभाग, कर्नाटक राज्य पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कायदा प्रशिक्षण आणि एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याचे उद्घाटन करून बोलताना न्या. मुरुली मोहन रेड्डी पुढे म्हणाले की, पोलिसांची सेवा आजच्या समाजासाठी अनमोल आहे. समाजाचे आरोग्य जपण्यासाठी पोलिसांनी काम केले पाहिजे. क्षमता विकास व कायदेविषयक प्रशिक्षण कार्यशाळेला आपण उपस्थित राहिलात, समाजात काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपांची, विशेषत: मुलांचे संरक्षण करण्यासाठी कसून चौकशी करावी हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारांना समजून घेऊन शिक्षा झाली पाहिजे, पोलिस अधिकाऱ्यांनी कायद्याचे रक्षण करावे, मुले चुकीचे काम करतात तेव्हा त्यांचे समुपदेशन करावे, बालकल्याण विभाग आणि बालसंरक्षण समितीने मुलांच्या संरक्षणासाठी प्रभावीपणे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील होते.
अप्पर पोलीस अधीक्षक एम वेणुगोपाल, महिला व बालकल्याण विभागाचे उपसंचालक नागराज आर., जिल्हा बाल संरक्षण विभागाचे जिल्हा अधिकारी महांतेश भजंत्री, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सिस्टर लुर्ड मेरी जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोप्पळ बालरक्षण प्रकल्पाचे समन्वयक हरीश जोगी, हावेरी जिल्हा पोलीस विभागाचे अधिकारी मल्लाप्पा जालगार संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थित होते.
या प्रशिक्षणाला पोलीस अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Tags: