गेल्या आठवड्यात शास्त्रीनगर भागात कोल्ह्या धुमाकूळ घातल्याची घटना ताजी असताना रविवारी रात्री वीरभद्रनगर, शिवाजीनगर भागातही एका कोल्ह्याने धुमाकूळ घातला आहे. या कोल्ह्याने एकाला चावा घेऊन किरकोळ जखमी केल्याची घटना देखील घडली आहे.
शिवाजीनगर भागात आलेल्या कोल्ह्याची दृश्य सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहेत. या संदर्भात वन खात्याला कल्पना देण्यात आली असून, कोल्ह्याला पकडण्याची तयारी वनखात्याने चालवलेली आहे. वीरभद्रनगरात डबल रोडजवळ या कोल्ह्याला पकडण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. या दरम्यान कोल्ह्याने एका युवकाच्या पायाचा चव घेऊन किरकोळ जखमी केल्याची घटना घडली आहे. यानंतर परिसरातील काही युवकांनी याचा व्हीडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकून लोकांना सतर्कतेचे आवाहन देखील केले आहे.
मागील वर्षी गणेशोत्सव काळातच बेळगावात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. रेसकोर्स परिसरामध्ये बिबट्या ठाण मांडून बसला होता. त्यामुळे तेथील शाळांना सुट्टी देखील देण्यात आली होती. त्या घटनेनंतर मागील आठवड्यात शास्त्रीनगर भागात कोल्हा दिसला होता. त्याने एकाला चावा घेऊन जखमी देखील केले होते. त्यांना वन खात्याने पकडुन पुन्हा जंगलात सोडून दिले होते. आता शिवाजीनगर, वीरभद्रनगर भागातही कोल्ह्याचे अस्तित्व दिसून असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वनखात्याने तातडीने कोल्ह्याला पकडून दूर जंगलात सोडून द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Recent Comments