Khanapur

अस्तित्वातच नसलेल्या तलावात काम दाखवून उकळले पैसे !

Share

भुरुनकी ग्रामपंचायतीने अस्तित्वातच नसलेल्या तलावाचे काम कागदोपत्री दाखवून निधीचा अपहार केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा बेंडीगेरी यांनी लोकायुक्तांकडे केली आहे.

खानापूर तालुक्यातील भुरनकी ग्रामपंचायतीमध्ये आर. एस. क्रमांक ९२ मध्ये तलाव असल्याचे कागदोपत्री दाखवून, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सातत्याने काम केल्याचे कागदोपत्री दाखवून करून शासकीय निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा बेंडीगेरी यांनी केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कर्नाटक लोकायुक्त कार्यालय, बेळगाव येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. भुरुनकी ग्रामपंचायतीमध्ये असे प्रकार वारंवार घडत आहेत, सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा बेंडीगेरी यांनी त्याच्या विरोधात एकट्यानेच हिंमतीने विरोध करत कायदेशीर लढाई लढत आहेत.

त्यामुळे आता त्यांनी दिलेल्या तक्रारीवर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकायुक्त कार्यालयाकडून कोणती कारवाई केली जाते, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Tags: