मूळ भारतीय वंशाचे व सिंगापूरमध्ये जन्मलेले अर्थतज्ज्ञ थर्मन षण्मुगरत्नम यांनी सिंगापूरच्या अध्यक्षीय निवडणुकीत शुक्रवारी प्रचंड बहुमताने विजय मिळवला. २०११ सालानंतर प्रथमच झालेल्या या निवडणुकीत त्यांनी एकूण मतदानापैकी ७० टक्के मते मिळवली. माजी वरिष्ठ मंत्री असलेले षण्मुगरत्नम यांनी २० लाख ४८ हजार मतदानापैकी ७०.४ टक्के इतकी भरघोस मते मिळवली.
त्यांचे चिनी वंशाचे प्रतिस्पर्धी नस कोक साँग आणि तान किन लिआन यांना अनुक्रमे १५.७२ टक्के व १३.८८ टक्के मते मिळाल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. निवडणूक अधिकारी तांग मेंग दुई यांनी मध्यरात्रीनंतर या निकालाची घोषणा केल्यानंतर, थर्मन हे सिंगापूरचे तिसरे भारतीय वंशाचे अध्यक्ष बनले.
२०११ ते २०१९ या काळात देशाचे उपपंतप्रधान राहिलेले थर्मन यांच्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान ली सेन लूंग यांनी त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांच्या पीपल्स अॅक्शन पार्टीने (पीएपी) या निवडणुकीत थर्मन यांना पाठिंबा दिला होता. ‘सिंगापूरवासीयांनी मला जे भरघोस समर्थन दिले आहे, त्यामुळे मी खरोखर विनम्र झालो आहे’, असे थर्मन म्हणाले.
ण्मुगरत्नम यांच्या सिंगापूरच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांचे अभिनंदन केले. ‘भारत- सिंगापूर सामरिक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्याची मी वाट पाहात आहे’, असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.


Recent Comments