National

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल

Share

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आल्यानं सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. यापूर्वीही त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सोनिया गांधी नुकत्याच मुंबईत झालेल्या इंडियाच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. यापूर्वी मार्चमध्येही सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांना ताप येत होता. तापाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 

त्यानंतर त्या बऱ्या होऊन घरी परतल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळली आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Tags: