बेळगाव नगर विकास प्राधिकरणाचे अभियंता एम. व्ही. हिरेमठ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या लोकल सेंटरतर्फे सत्कार समारंभ आयोजिण्यात आला होता.

बेळगावातील नेहरुनगरमधील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या लोकल सेंटरच्या सभागृहात रविवारी एम. व्ही. हिरेमठ यांचा निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामीजी, हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या उपस्थितीत एम. व्ही. हिरेमठ यांचा सत्कार करून निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना कर्नाटक राज्य माध्यान्ह आहार पुरवठादार स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाचे अध्यख चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले की, सगळ्यांना, विशेषतः वडीलधाऱ्यांच्या मन राखण्याचा चांगला गुण हिरेमठ यांच्यात आहे. महांतेश हिरेमठ हे एक विनम्र व्यक्ती आहेत, ते संयमाने वागतात. त्यांनी सतत कठोर परिश्रम घेऊन आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत असे गौरवोद्गार स्वामीजींनी काढले.
बेळगावच्या कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामीजी म्हणाले, महांतेश हिरेमठ हे दुर्मिळ आणि साधे गृहस्थ आहेत. त्यांची आमची ओळख आमदार फिरोज सेठ यांच्या माध्यमातून झाली. महांतेश हिरेमठ सकाळी 6 ते 11 या वेळेत सतत आमदारांसोबत काम करत असत. बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पात त्यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. सर्वांचा आदर करण्याचा संस्कार त्यांना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सत्कारमूर्ती एम. व्ही. हिरेमठ म्हणाले की, 1983 ते 2015 पर्यंत प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी माझा आकार वेगळा होता. हुक्केरी स्वामींना माझी गोष्ट माहित आहे. प्रत्येकजण माझ्याजवळ यायला घाबरत होता, त्यांना भीती वाटत होती की मी ओरडेन का? प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून माझ्यात सकारात्मक बदल झाले. कसलीही इच्छा न ठेवता, त्या स्थितीत स्वीकारले तर विश्रांतीशिवाय सुख
शांती मिळते. सेवाकाळात मी बदलीसाठी कोना मंत्र्याकडे गेलो नाही. समाजाचा सेवक म्हणून काम करण्याची, सर्वांना मदत करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवानंद हुगार, निवृत्त मुख्य अभियंता एस. व्ही. कुंदरगी, पी. एम. गानिगेर, बी. जी. धरणी, बसवराज हुगार, व्ही. बी. कलकेरी, एस. सी. नाईक आदी उपस्थित होते. बसवराज कुप्पसगौडर यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments