श्रावणी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून बेळगावातील भेंडी बाजार मोतीलाल चौक येथील सिद्धीविनायक मंदिरात आज भक्तांना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
मोतीलाल चौक येथील सिद्धीविनायक मंदिरात आज रविवारी सकाळी माजी आमदार अनिल बेनके, लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, व सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले .
तब्बल 101 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले असे मंडळाचे अध्यक्ष रोहित रावळ यांनी सांगितले. प्रारंभी गणेशाची पूजा माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, व सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव उपस्थित होते.
रोहित रावळ, रमेश भंडारी, राजू पालीवाल, मदन तिवारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दर संकष्टीला सिद्धी विनायक मंदिरात साबुदाणा खिचडी करून गणेश भक्तांना प्रसाद वाटप करण्याचा संकल्प केला आहे.


Recent Comments