Belagavi

श्री गणेश फेस्टिवल निमित्त पाककला स्पर्धा

Share

बेळगाव मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 22 व्या बेळगाव श्री गणेश फेस्टिवलमध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत बेळगाव परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला .

ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत, हरभरा डाळी पासून बनवले जाणारे गोड पदार्थ व तिखट पदार्थ अशा दोन गटात पाककला स्पर्धा आयोजित केली होती. एकूण 50 पेक्षा जास्त महिला स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये उत्साहात भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले.गणेश पूजन श्री भक्ती महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरपर्सन ज्योती अग्रवाल यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी राजमाता महिला सोसायटीच्या चेअर पर्सन मनोरमा देसाई, प्रतिभा नेगीनहाळ ज्ञानमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव, भक्ती देसाई, डॉ मीना पाटील तसेच राजमाता संस्थेच्या आणि भक्ती सोसायटीचे सर्व संचालिका आणि गणेश फेस्टिवल चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेत हरभरा डाळीच्या तिखट पदार्थांच्या गटात प्रथम क्रमांक रश्मी बराटे,द्वितीय क्रमांक दया देसाई, तृतीय क्रमांक गीता जुवेकर तसेच हरभरा डाळीचे गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक नमिता पाटील, द्वितीय क्रमांक वर्षा शिंदे, तृतीय क्रमांक गीता जुवेकर यांनी पटकविला. यावेळी परीक्षक म्हणून प्रियंका कलघटगी, श्वेता देसाई,भूमिका बाजीगर व वरलक्ष्मी कडगोड यांनी काम पाहिले.विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

श्री गणेश फेस्टिवल च्या तिसऱ्या दिवशी उद्या सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता एकपात्री नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मोबाईल-सोशल मीडियाचे दुष्परिणाम या विषयावर आधारित स्पर्धकांना सादरीकरण करावे लागणार आहे. सदर स्पर्धा 15 वर्षांवरील मुली आणि महिलांसाठी मर्यादित आहे.

Tags: