Chikkodi

बावनसौंदत्तीच्या ग्रामस्थांनी हेस्कॉम कार्यालयाला घातला घेराव

Share

वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ बावनसौंदत्ती येथील ग्रामस्थांनी रायबाग येथील हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले.

शेकडो लोकांनी हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालून निदर्शने करत अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत हेस्कॉमचे अधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले.
शेतकऱ्यांच्या पंपसेटला होणाऱ्या वीज पुरवठ्यातील अनियमित लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांची भुईमूग, चवळी, सोयाबीन, उडीद , हरभरा, ऊस ही पिके पाण्याविना पूर्णत: सुकून जात आहेत. पिकांवर लाखो रुपये खर्च करूनही आम्ही मनस्ताप करत बसलो, विजेचा प्रश्न मार्गी लावला नाही तर सर्व शेतकऱ्यांना हिंसक आंदोलन करून उपोषण करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी ग्रा.पं.अध्यक्ष रामचंद्र काटे, अनिल हंजे, जिनेश्वर मगदुम, जयकुमार खेमलापुरे, काका तडके, अजित खेमलापुरे, अण्णासाहेब मगदुम्म, सत्याप्पा भिस्ते, केदारी डोंगरे, अरुण शिंदे, बैरू चौगले, राजागौडा पाटील, मंगळवेढा पाटील, यांच्यासह अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला

Tags: