Banglore

कर्नाटकातील जेडीएसचे एकमेव खासदार प्रज्वल रेवण्णा अपात्र; देवेगौडा कुटुंबाला धक्का

Share

कर्नाटकातील जेडीएसचे एकमेव खासदार प्रज्वल रेवण्णा यांना अपात्र ठरविल्याचा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे देवेगौडा कुटुंबाला धक्का बसला आहे.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि माजी मंत्री रेवण्णा यांचे पुत्र असलेल्या हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. निवडणूक आयोगाला खोटी माहिती देण्याचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने हा निकाल दिला आहे. आयकराबाबत खोटी कागदपत्रे जोडल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. याबाबत त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ए. मंजू आणि देवराजगौडा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, निकालानंतर प्रज्वल रेवण्णा यांनी एचडीकेंची भेट घेतली. निकालाची परत अद्याप मिळाली नसून ती मिळाल्यावर प्रतिक्रिया देईन असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Tags: