Belagavi

अभियंता एम. व्ही. हिरेमठ यांना सेवानिवृत्तीनिमित्त बुडातर्फे निरोप

Share

बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे (बुडा) अभियंता एम. व्ही. हिरेमठ यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्याचा कार्यक्रम प्राधिकरणाच्या सभागृहात पार पडला.
बेळगाव नगर विकास प्राधिकरणाचे अभियंता म्हणून अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले एम. व्ही. हिरेमठ यांचा निरोप समारंभ बुडा सभागृहात पार पडला. यावेळी बुडा अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे हिरेमठ यांचा शाल, श्रीफळ, फळे, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला. सत्काराला उत्तर देताना हिरेमठ यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सांगितले की, नागरी सेवा हे सोपे काम नाही, मिळालेल्या कामावर प्रेम करावे लागते. वेळेवर काम करण्यावर जास्त भर देऊन प्रेमाने काम करावे लागेल. मी 6 वाजता फिल्डवर जात होतो. अनेक कठीण दिवस आले. पण निष्ठेने काम केले. त्यामुळे कामाचे समाधान मिळाले. समाधान आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. माझ्या सेवेच्या काळात काही चुका, कोणाचा अवमान झा असेल तर, मी माफी मागतो असे सांगून सेवकाळातील आठवणींनी ते भावूक झाले.
नगररचना कार्यालयाचे बी. व्ही. हिरेमठ यांनी सांगितले की, हिरेमठ कदाचित वयाच्या अटीमुळे निवृत्त झाले असतील, ते फक्त नियमासाठी आहे, पण त्यांचे मन अजून तरुण आहे. आम्हाला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सेवानिवृत्ती ही एक प्रक्रिया आहे, सेवाकाळात समाजसेवा केली पाहिजे. तरच निवृत्तीनंतरही लोकांना अधिकाऱ्यांची आठवण येईल.
एम. व्ही. हिरेमठ यांच्या कन्येने यावेळी बोलतांना सांगितले की, आमचे वडील खूप कष्ट करायचे आणि वक्तशीर होते आणि सामाजिक सेवा करण्यातही पुढे होते. माझ्या वडिलांनी केलेले कार्य आपल्या सर्वांसाठी एक उदाहरण आहे. कर्मचार्‍यांनी आमच्या वडिलांवर दाखवलेले प्रेम मोठे आहे. कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
बुडा आयुक्त शकील अहमद म्हणाले की, एम. व्ही. हिरेमठ हे अत्यंत कार्यक्षम व प्रामाणिक अधिकारी असून ते नेहमी आमच्या कर्मचार्‍यांना मार्गदर्शन व मदत करतात. ते सेवानिवृत्त होत आहेत याचे दु:ख आहे. त्यांनी बुडासोबत राहून नेहमी आम्हाला मार्गदर्शन करावे.
या निरोप कार्यक्रमास बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाचे बळीगड्डी यल्लाप्पा, महांतेश हिरेमठ, एस. ए. नाईक, प्रसन्न हेरूर यांच्यासह बुडा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: