Belagavi

सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात सामूहिक पडली भरण्याचा कार्यक्रम

Share

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थस्थान असलेल्या यल्लम्मा मंदिरात सामूहिक पडली सेवा कार्यक्रम पार पडला.
श्रावण महिन्यातील पौर्णिमेनिमित्त आज यल्लम्मा देवीची विशेष पूजा व सजावट करण्यात आली. त्याचप्रमाणे सामूहिकपणे पडली भरण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. मंदिराचे मुख्य पुजारी येडियुरैया यांच्या नेतृत्वाखाली विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीत पारंपारिक पडली भरणे आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी रेणुका-यल्लम्मा देवीचा उदगार करत अनेक महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी मंदिराचे कार्यकारी अधिकारी एसपीबी महेश, मंदिराचे अधीक्षक अरविंद माळगे, मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य वाय. वाय. काळप्पनवर, कोळप्पगौडा गंदिगवाड व मंदिराचे कर्मचारी उपस्थित होते

Tags: