Belagavi

फादर एडी स्मृती फ़ुटबाँल चषक स्पर्धेला बेळगावात शानदार प्रारंभ

Share

संपूर्ण बेळगावकरांसाठी फुटबॉलची पर्वणी ठरलेल्या 17 वर्षाखालील आंतरशालेय फादर एडी स्मृती फ़ुटबाँल चषक स्पर्धेला आज शानदार प्रारंभ झाला.
बेळगावातील कॅम्प येथील शतकोत्तर सेंट पॉल्स हायस्कूलच्या मैदानावर आज शुक्रवारी सकाळी 55व्या 17 वर्षाखालील आंतरशालेय फादर एडी स्मृती फ़ुटबाँल चषक स्पर्धेचे शानदार समारंभात प्रारंभ झाला. सेंट पॉल्स हायस्कूल, सेंट पॉल्सची माजी विध्यार्थी संघटना पोलाईट्स ऑफ बेलगाम वर्ल्ड वाईड यांनी या स्पर्धेचे आयोजन केले असून, बिग व्हेंचर्स ब्रॉड बँड प्रायोजक आहेत. बेळगावच्या गुन्हे व वाहतूक विभागाच्या उपायुक्त स्नेहा पी. व्ही. यांच्याहस्ते ध्वजारोहण करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.


यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त स्नेहा पी. व्ही. म्हणाल्या की, फ़ुटबाँल हा संपूर्ण शरीराला व्यायाम घडवून आणणारा खेळ आहे. शरीराचा स्टॅमिना आणि लवचिकता वाढविण्यासाठी हा खेळ खेळणे आवश्यक आहे. विध्यार्थ्यानी, तरुणांनी अशा खेळात सहभागी होऊन शरीरसंपदा उत्तम राखावी. ड्रग्जसारख्या व्यसनांच्या आहारी न जाता खेळांच्या माध्यमातून आरोग्य तंदुरुस्त राखावे असं आवाहन करून, त्यांनी सहभागी संघांच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. बाईट.
यावेळी बोलताना स्पर्धेचे मुख्य प्रायोजक बिग व्हेंचर्स ब्रॉड बँडचे प्रवर्तक नागेश छाब्रिया यांनी सेंटपॉल्स मधील आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी सांगितल्या. मी शालेय जीवनात फ़ुटबाँलची आवड असूनही टेबल टेनिसचा जिल्हास्तरीय विजेता ठरलो होतो. फ़ुटबाँल या खेळामुळे तंदुरुस्ती राखता येते. आज सर्वच खेळातील खेळाडूंना आणि नागरिकांना भारतीय संघ आंतरराष्ट्रीय फ़ुटबाँल स्पर्धेत चमकावी असे वाटते. त्यामुळेच आम्ही फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम राबवत आहोत असे त्यांनी सांगितले.
सेंट पॉल्सची माजी विध्यार्थी संघटना पोलाईट्स ऑफ बेलगाम वर्ल्ड वाईडचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी स्पर्धेच्या संयोजनाची माहिती देऊन पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रमुख पाहुण्या डीसीपी स्नेहा यांनी सहभागी संघातील खेळाडूंची ओळख करून घेतली. यावेळी हवेत फुगे सोडून स्पर्धेचे उदघाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी फादर सॅवियो, फादर सायमन, अनिकेत क्षेत्रीय, फादर सेबॅस्टिन, परेश मुरकुटे, फादर स्टीव्हन, सुमुख छाब्रिया, अमित पाटील, किरण निपाणीकर, इम्रान सनदी, जसमिंदर खुराणा, तन्वीर मुन्शी, सेंट पॉल्सचे आजी-माजी विध्यार्थी, विविध शाळांच्या फ़ुटबाँल संघांचे खेळाडू आणि फ़ुटबाँल रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: