विजेचा धक्का लागून पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी गावात घडली .
वडील प्रभाकर हुंडी (75) आणि मुलगा मंजुनाथ हुंडी (32) यांचा मृत्यू झाला आहे. घरासमोरील विद्युत खांबाला बांधलेली सपोर्टिंग वायर काढण्यासाठी गेले असता प्रभाकर यांना विजेचा धक्का लागला. पुढे वडिलांच्या मदतीला गेल्याने मुलगा मंजुनाथलाही जीव गमवावा लागला.
घराजवळील कचरा काढताना जमिनीवर पडलेली विजेची तार काढण्यासाठी गेले असताना वडिलांना विजेचा धक्का असून ते जमिनीवर कोसळल्याचे पाहून त्याचा मुलगा मंजुनाथ मदतीला आला. त्यानंतर त्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे पिता-पुत्राचा मृत्यू झाला. हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याचा संताप कुटुंबीयांनी व्यक्त केला असून दोडवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यावे, असा स्थानिकांनी केला .
Recent Comments