बेळगाव जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या वतीने दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांचा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
मालदीव येथे नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचे शरीरसौष्ठवपटू व्यंकटेश ताशिलदार याने कांस्य पदक पटकावले आहे. तर प्रवीण कणबरकर यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे प्रताप कालकुंद्रीकर व केतकी पाटील यांची नेपाळ येथे होणाऱ्या आशियाई तसेच दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल या चारही शरीरसौष्ठवपटूंचा सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी अजित सिद्धण्णावर, एम. गंगाधर, सुनील राऊत आदी उपस्थित होते.



Recent Comments