बेळगाव येथील सुवर्णविधान सौध येथे मानवी तस्करी : जागृती आणि प्रतिबंध या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सुवर्ण विधान सौध, बेळगाव येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग, वरनाडू सेवा संघ म्हैसूर, स्पंदन संघटना बेळगाव आणि जिल्हा बाल बाल रक्षण विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी तस्करी प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली
कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी मानवी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांसह सर्व विभागांनी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. सुवर्ण विधान सौध येथे ही कार्यशाळा होत असल्याने सर्व अधिकार्यांची जबाबदारी वाढली आहे. असे कार्यक्रम समाजात सेवा करणार्या आपल्या सर्वांना उपयोगी पडतात. पोलिसांनीही याबाबत जबाबदारीने काम केले पाहिजे. मानवी तस्करी वाढत असताना बेजबाबदारपणा दाखवू नये, रात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्यांची पोलिसांनी चौकशी करावी, कोणी गोंधळ घातल्यास त्यांना तातडीने पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पी मुरली मोहन रेड्डी म्हणाले की, 2017 ते 2000 पर्यंत आम्ही न्यायपालिकेच्या कार्यकारी विधीमंडळात काम केले आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी संबंधीत सरकारी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम केले पाहिजे. अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे मानवी तस्करीबाबत जागृती निर्माण होऊन ती रोखण्यासाठी मदत होईल, असे ते म्हणाले.
यावेळी प्रांताधिकारी श्रावण नायक, महिला व बालकल्याण विकास विभागाचे उपसंचालक नागराज आर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महांतेश भजंत्री, बाल कल्याण विभागाच्या अध्यक्षा सिस्टर लुर्डी मेरी जे उपस्थित होत्या.
वरनाडू म्हैसूरच्या सेवा संस्थेचे स्याग्नि के. व्ही., परशुराम एम. एल., स्पंदन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. सुशील, युनिसेफच्या बालरक्षण योजनेचे कोप्पळ येथील प्रादेशिक संयोजक के. राघवेंद्र भट, अतिथी म्हणून उपस्थित होते.
Recent Comments